पुणे - पीएमपीच्या मालमत्तेवरील जाहिरातींचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरातदाराची नेमणूक लवकर होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात पीएमपीच्या मालमत्तांवर कोणीही जाहिराती लावू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. पीएमपीच्या बस, बस शेड्स, पुणे पॅटर्न बस शेड्स, स्टेनलेस स्टीलचे बस शेड, बीआरटी बस शेल्टर्स, लॉलीपॉप पिलर्स आदींवर जाहिराती लावण्यासाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. लवकरच याबाबतचे कंत्राट संचालक मंडळामार्फत देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment