डॉ. अरुण गद्रे यांचे मत : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविषयीच्या परिसंवादात वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडली मते
पुणे – डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु रुग्णांना वैद्यकीय उपचारांविषयीच्या तक्रारी नोंदवण्यास जागाच न उरणे आणि वैद्यकीय व्यवसायाला कारखानदारीच्या वळणावर नेणारे “कॉर्पोरेटायझेशन’ या दोन गोष्टी समाजात असंतोष निर्माण होण्यामागची महत्त्वाची कारणे ठरली आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर संघटनांनीही एक पाऊल मागे येऊन या गोष्टींचा विचार करायला हवा,’ असे परखड मत वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व पुणे सिटिझन डॉक्टर्स फोरमचे सदस्य डॉ. अरुण गद्रे यांनी व्यक्त केले. वैद्यकीय उपचारांविषयीच्या तक्रारींवर दाद मागण्यासाठी जागोजागी तक्रार निवारण केंद्रे तयार करायला हवीत, असेही त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment