Friday, September 28, 2018

मेट्रोला मान्यता; पालिकेला ठेंगा

मेट्रो प्रकल्पाच्या खडकी परिसरातील कामासाठी संरक्षण मंत्रालयाने 'ग्रीन सिग्नल' दिला असला, तरी पुणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मान्यता मिळेपर्यंत 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ला (महामेट्रो) या ठिकाणी कामाचा विस्तार करण्यावर मर्यादा येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने पालिकेच्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला त्वरेने मान्यता द्यावी, यासाठी पालिका आयुक्तांमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment