पुणे - पुण्यात जनता वसाहत येथे मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पुलाजवळील जनता वसाहत जनता चौकाजवळ खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा आहे.
कालव्यतील पाणी भराव फुटल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे विभागाला माहिती कळविताच कालवा बंद केला.त्यामुळे कालव्यातील पाणी सिंहगड रस्त्यावर वाहत असुन रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पुलाजवळील रामकृष्ण मठात, घरात, गॅरेज आणि दुकानामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment