आपल्या लाडक्या बाप्पाला तीन दिवसांनी निरोप देताना प्रदूषणाचे विघ्न निर्माण होऊ नये, यासाठी एका तरुणाची धडपड सुरू आहे. निर्माल्य नदीत फेकल्याने जलप्रदूषण होऊ नये, यासाठी या तरुणाने ‘निर्माल्य द्या आणि खत घ्या’ ही चळवळ सुरू केली. निर्माल्यावर प्रक्रिया करून महिना-दोन महिन्यांनी पुन्हा खत नागरिकांना दिले जाते आणि खर्या अर्थाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा होतो, ही यामागची भावना आहे. याला मिळालेला प्रतिसाद पाहून यावर्षीपासून खताबरोबरच रोप देण्याचा संकल्प या तरुणाने केला आहे. त्याचे नाव आहे विकास डाबी.


No comments:
Post a Comment