अनधिकृत मांडवांवर कारवाईस टाळाटाळ भोवणार : माहिती असूनही कारवाई न केल्याने अडचण वाढणार
पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार, गणेशोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर महापालिका तसेच पोलिसांची परवानगी न घेता अनधिकृतपणे मांडवावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाच महापालिका सहायक आयुक्त चांगलेच अडचणीत आले आहेत. या अधिकाऱ्यांना अतिक्रमण विभागाकडून नोटीस बजाविण्यात आली असून तातडीने खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या अधिकाऱ्यांचा खुलासा महापालिकेकडून उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.
No comments:
Post a Comment