पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने क्षेत्र विकास (एरिया डेव्हप्लमेंट) साठी निवड केलेल्या क्षेत्राची हद्द दीडपट वाढविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2017 मध्ये स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव अखेर येत्या 3 ऑक्टोबरला होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत ठेवला आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यतेनंतर या हद्दवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.
No comments:
Post a Comment