पुणे - उजवा मुठा कालवा फुटल्याने लष्कर आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मोठा फटका बसणार आहे. या दोन्ही केंद्रांवर अवलंबून असलेल्या शहराच्या जवळपास निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २८) विस्कळित होण्याची शक्यता आहे. कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. ते पूर्ण होईपर्यंत लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर अवलंबून असलेल्या भागाला किमान दोन-तीन दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment