पुणे : पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गावरील बुधवार पेठ (फडके हौद) स्टेशनकरिता लागणार्या जागेमुळे अडीचशे कुटुंबे बाधित होणार असून, या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन स्टेशनपासून जवळच करण्याचे नियोजन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) केले आहे. येत्या आठवड्यापासून सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असून, आगामी दोन ते तीन महिन्यांत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे.भुयारी स्टेशनमुळे बाधित होणार्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी तीन पर्याय निश्चित केल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक प्रमोद आहुजा यांनी मंगळवारी दिली. ‘महामेट्रो’तर्फे बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात होते. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसली, तरी त्यांच्या पुनर्वसनासाठीचे धोरण निश्चित झाले आहे.
No comments:
Post a Comment