पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस आता वेग येणार आहे. शासनाने पुरंदर विमानतळासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच नियोजन करण्यासाठी नगररचना नियोजनकार आदी अधिकारी नेमण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) आता अधिकारी नेमले जाणार असून त्यांच्यावर कामाची जबाबदारीही निश्चित केली आहे.
No comments:
Post a Comment