पुणे - शहरातील रस्त्यांवर यंदा खड्डे पडले नसल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने गल्लीबोळातील रस्त्यांना मात्र चारच महिन्यांत तब्बल ६३ कोटी रुपयांचे डांबर फासल्याचे उघड झाले आहे. काही मोजक्याच प्रभागांमधील रस्त्यांची डागडुजी करीत, संपूर्ण डांबरीकरण केल्याच्या नोंदी दाखविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मात्र ही कामे कधी आणि कोणी केली, याचा थांगपत्ताही संबंधित खाते लागू देत नाही. त्यामुळे रस्त्यांचा निधी हा अधिकारी आणि ठेकेदारांकरिता मंजूर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे कागदोपत्री डांबरीकरणाची नगरसेवकांना कल्पना नसावी, हेही आश्चर्यकारकच आहे.
No comments:
Post a Comment