पुणे पोलिस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर दिवसाला २५ ते ३० हजार फोन येत होते. त्यामध्ये जवळजवळ ९० टक्क्यांपेक्षा जास्त फोन कॉल्स हे बिनकामाचे असल्यामुळे गरजू व्यक्तींना वेळप्रसंगी १०० क्रमांक लागत नव्हता. त्यामुळे पुणे पोलिसांनी बिनकामाचे फोन कॉल्स रोखण्यासाठी 'इंटर अॅक्टीव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम' (आयव्हीआरएस) अंमलात आणली आहे. ही सिस्टीम सुरू केल्यापासून फोन कॉल्सची संख्या केवळ एक हजार ते दीड हजारांवर आली आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी कमी होऊन गरजूंना तत्काळ मदत मिळू लागली आहे.
No comments:
Post a Comment