महामेट्रोकडून वाहतूक विभागांच्या अटींचे पालन करण्यात येत नसल्यामुळे वनाझ ते सिव्हिल कोर्टदरम्यान सुरू असलेले मेट्रोचे काम बंद करण्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. कामामुळे रस्ते खराब होऊन वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. ड्रेनेज झाकणे उघडी ठेवणे, वॉर्डन नेमणूक न करणे, वाहतूक सिग्नल, सूचनांचे फलक न लावल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे महामेट्रोकडून सात दिवसात अटींचे पालन न झाल्यास काम बंद करण्याचा इशारा वाहतूक विभागाने मेट्रो रेल कॉर्पोरेशन ला दिला आहे.
No comments:
Post a Comment