Saturday, September 29, 2018

देशपांडे उद्यानामध्येसाकारणार ‘कलाग्राम’

नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात विविध राज्यांतील लोककला तसेच ग्रामीण कलासंस्कृती एकाच ठिकाणी पाहता यावी, यासाठी 'कलाग्राम' साकारले जाणार आहे. या कलाग्रामचे काम करण्यासाठी ५६ लाख ३५ हजार रुपयांचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यास नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सुमारे सहा कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून आमदार माधुरी मिसाळ यांच्या विकासनिधीतून १ कोटी तर खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून ७५ लाख रुपये या कलाग्रामसाठी दिले जाणार आहे.

No comments:

Post a Comment