Saturday, September 22, 2018

बंदोबस्तासाठी पावणेआठ हजार पोलीस

1,250 सीसीटीव्हीची नजर : 2 हजार गणेश मंडळांचा सहभाग
मुख्य मार्गावर 600 मंडळे सहभागी होणार

पुणे – पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही मिरवणूक शांततेत व विनाअडथळा पार पडावी यासाठी तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साडेबाराशे सीसीटीव्हीवरून नजर ठेवली जाणार आहे. त्याच बरोबर बॉम्ब शोधक-नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकही तैनात केले जाणार आहे. शहरामध्ये दोन हजार गणेश मंडळे आहेत. त्यापैकी 600 मंडळे मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment