चौफेर न्यूज – पुण्यातील जनता वसाहतजवळून जाणारा मुठा कालवा गुरूवारी दुपारी फुटला असून यामुळे दांडेकर पुलावर पाणी आले आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. या घटनेत परिसरातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संतप्त नागरिकांनी महापौरांना घेराव घालत प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.
No comments:
Post a Comment