Saturday, September 29, 2018

जागतिक क्रमवारीमध्ये विद्यापीठाचे स्थान उंचावले

पुणे - ‘ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक स्तरावरील मूल्याकंनात पहिल्या पाचशे एक ते सहाशे विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. शैक्षणिक संस्थांचे जागतिक स्तरावर मूल्यांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकाविला असून, पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे विद्यापीठ वगळता देशातील एकाही विद्यापीठाचा जागतिक स्तरावरील पहिल्या सहाशेपर्यंतच्या क्रमवारीत समावेश झालेला नाही. ‘टाइम्स’ संस्थेकडून दरवर्षी जगभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. 

No comments:

Post a Comment