Tuesday, September 18, 2018

ढोल-ताशा पथकांवर यंदाही निर्बंध

पुणे – गणपती प्रतिष्ठापना दिनी शहरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांनी रस्त्यावर जागोजागी थांबून बराच वेळ वादन केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक गणेश मंडळापुढे असणारे ढोलपथके आणि त्यांच्या संख्येवर पोलिसांनी मर्यादा आणली आहे. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत जागोजागी थांबून बऱ्याच वेळ वादनाचे आवर्तन करण्यास निर्बंध आणण्यात आले आहेत. हे निर्बंध मागील वर्षीप्रमाणेच आहेत, याला बहुतांश ढोल पथकांनी सहमती दर्शवली आहे. यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेवर संपते का ? हे पहाणे ऊत्सुकतेचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment