15 जुलैपासूनच बंद होते काम : माघारी मान्सूनला सुरुवात झाल्याने निर्णय
पुणे : गेल्या अडीच महिन्यांपासून नदीपात्रात बंद असलेले मेट्रो मार्गाचे काम गेल्या आठवड्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 15 जुलैपासून शहरात तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने 15 जुलैपासूनच खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर हे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता माघारी मान्सूनला सुरुवात झाल्याने तसेच यापुढे धरणातून पाणी सोडण्याची शक्यता कमी असल्याने जलसंपदा विभागाशी चर्चा करून हे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment