पुणे - डोकं दुखतंय, ताप आलाय, सर्दीदेखील आहे, अशा आरोग्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या पाचपटीने वाढल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्टरांनी नोंदविले आहे. शहरात डेंगी या कीटकजन्य आणि स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही लक्षणे असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.
No comments:
Post a Comment