Friday, September 21, 2018

बस ताफा अपुरा; तरीही “बीआरटी’ तूर्तास नको

पीएमपी महापालिका आयुक्‍तांकडे गाऱ्हाणे

पुणे – पीएमपी प्रशासनाकडे सद्यस्थितीत सुरू असलेल्या “बीआरटी’ अर्थात “बस रॅपिड टान्झिस्ट’ मार्गावर चालविण्यासाठी पुरेशा बसेस उपलब्ध नाहीत. यातच स्वारगेट-कात्रज “बीआरटी’ मार्ग सुरू झाल्यास प्रशासनाला संचलन शक्‍य नाही. त्यामुळे हा मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पीएमपी प्रशासनाने महापालिका आयुक्तांना केली आहे. यामुळे सध्यातरी हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून नवीन बसेस आल्यावरच हा मार्ग सुरू होऊ शकतो.

No comments:

Post a Comment