पुणे - शेती शाश्वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्लस्टर डेव्हलपमेंट, समूहशेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे अत्यावश्यक आहे. यावर प्रकाश टाकणारा तसेच स्मार्ट व शाश्वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा ‘कृषिकल्चर’ हा एकदिवसीय ज्ञानसोहळा ‘एपी ग्लोबाले’ समूहातर्फे येत्या एक ऑक्टोबरला पुण्यात आयोजिला आहे.
No comments:
Post a Comment