Friday, October 26, 2018

पुण्यात पाच नव्हे; दोनच तास पाणी

पुणे - पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सलग पाच तास पाणीपुरवठ्याची योजना आखली आणि तिचे वेळापत्रकही जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र, नव्या वेळापत्रकानुसार बहुतांशी भागांतील लोकांना दोन- अडीच तासच पाणी मिळणार आहे. तेही मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जागरण करावे लागणार आहे. येरवड्यासह कोथरूडचा काही भाग, बावधन, पाषाण- सूस रस्ता, हडपसर, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर परिसराला अपुरे म्हणजे, दोन- अडीच तासच पाणी मिळणार असल्याचे वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे. परिणामी, पाणीटंचाईवर शोधलेली समान आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची योजना फसण्याची चिन्हे आहेत. 

No comments:

Post a Comment