Saturday, October 27, 2018

‘पाण्याचे मीटर बसविण्यासाठी शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई’

धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही कृत्रिम पाणीटंचाई करून ठेकेदाराला मीटर बसविण्याचा ठेका देण्याचा डाव सत्ताधारी पक्षाने आखला आहे. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसकडून शुक्रवारी करण्यात आला. अधिकाऱ्यांचे परदेश दौरे आणि पाण्याचे मीटर बसविण्याच्या प्रक्रियेचे नियोजन जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment