केंद्र सरकारचे नियम डावलून 'पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'च्या (पीएससीडीसी) चीफ नॉलेज ऑफिसर आणि कंपनी सचिव (सीएस) पदांसाठीची भरती केली गेल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी केला. या भरती प्रक्रियेची जाहिरात देण्यापासून ते नियुक्तीपर्यंतच्या सर्व कागदपत्रांची सविस्तर चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी मनसेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment