स्मार्ट सिटी योजना हे भाजप-शिवसेना सरकारचे भ्रष्टाचाराचे कुरण असून या योजनेतील प्रचंड गोंधळ, आर्थिक अनियमिततेमुळे जनतेच्या कररूपी पैशाची लूट होत असल्याचा धक्कादायक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. स्मार्ट सिटी योजनेवर कोट्यवधी रुपये खर्चूनही दोन वर्षांत अवघे चारच प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचे, तसेच सल्लागार कंपनीच्या कामाचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
No comments:
Post a Comment