पुणे - भगदाड पडलेल्या भिंती, खचलेला भराव, साचलेला गाळ, राडारोडा, कचऱ्याचे ढीग...आणि पुन्हा कधीही, कुठेही भगदाड पडण्याची भीती...हे चित्र आहे मुठा नदीच्या उजव्या कालव्याचे. गेल्या महिन्यात जनता वसाहत येथे हा कालवा फुटून दांडेकर पूल परिसरातील शेकडो कुटुंबाचे संसार त्या पाण्याबरोबर वाहून गेली होते. त्या घटनेला आज एक महिना झाला. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने पुन्हा या कालव्याची खडकवासला ते जनता वसाहत पाहणी करून आढावा घेतला, तेव्हा कालव्याची दुरवस्था नजरेसमोर आली.
No comments:
Post a Comment