Tuesday, October 30, 2018

दुष्काळग्रस्तांची दिवाळी पुणेकर करणार गोड

पुणे : दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी दिवाळीचा आनंद अनेक कुटुंबापासून दूरच आहे. आपल्याकडे दिवाळीची तयारी उत्साहात सुरु असताना, तेथे मात्र कुटुंबातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरत असतात. त्यामुळे बीडमधील दुष्काळग्रस्त भागांतील घरांमध्ये फराळ पाठवून त्यांची दिवाळी गोड करण्याकरीता पुण्यातून पुढाकार घेण्यात आला आहे. दिवाळीचा सण एकट्याने साजरा करण्यापेक्षा सर्वांना घेऊन साजरा केल्यास ती दिवाळी मोठी आनंददायी ठरेल. आपण दिवाळी आनंदात साजरी करणार आणि त्यांना पाण्याचे शुक्लकाष्ठ. त्यामुळेच ही दिवाळी त्यांना पण आनंनददायी ठरेल, अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment