शहर सुधारणा समितीच्या बैठकीला अधिकारी सातत्याने दांडी मारतात. या बैठकांना अधिकारी आपले प्रतिनिधीही पाठवत नसल्याने समितीच्या कामकाज पार पडत नसल्याची गंभीर दखल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतली आहे. या पुढील विषय समितीच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या खाते प्रमुख तथा त्यांच्या प्रतिनिधींवर प्रशासकिय शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी राव यांनी दिली आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या तक्रारी स्थायी समिती, शहर सुधारणा समितीकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, या बैठकांना फारसे गांर्भीयाने घेतले जात नसल्याचे वारंवार दिसते आहे.
No comments:
Post a Comment