ऐन सणासुदीच्या तोंडावर महापालिकेने शहराला सोमवारपासून एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यापू्र्वीच नागरिकांकडून पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारी केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठ्यासंदर्भात सर्व पंधरा प्रभाग समित्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत, तसेच पाण्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
No comments:
Post a Comment