पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी नियमभंगाचे खटले दाखल असलेल्या वाहनचालकांनी पारपत्र तसेच चारित्र्यपडताळणीसाठी अर्ज केल्यास तेथे त्यांना अटकाव घालण्याबाबत पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच निर्बंध घातलेल्या रस्त्यांवर सर्रास नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी महापालिका कायद्याचा २००३ (पीएमसी अॅक्ट) वापर करण्यास सुरुवात केली आहे.
No comments:
Post a Comment