पुणे : आपल्या घराच्या परिसरातील शाळांचे महापालिकेच्या विभाग प्रमुखांनी पालकत्व घ्यावे, तसेच दैनंदिन कामकाजातून वेळ काढून या शाळांना भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांसह, सहायक आयुक्तांना केले होते. मात्र, एकाही अधिकार्याकडून याला प्रतिसाद देण्यात न आल्याने महापालिका आयुक्तांनी थेट 139 अधिकार्यांवर पालकत्वाची जबाबदारी टाकली आहे. त्यात सर्व विभाग प्रमुखांसह, उपायुक्त, सहायक आयुक्त, निरीक्षकापासून ते कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. शाळांचा दर्जा वाढावा, मुलांना आवश्यक सोयीसुविधा तातडीने मिळाव्यात आणि गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने आयुक्तांनी मागील महिन्यात घेतलेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत याबाबत सूचना केल्या होत्या.
No comments:
Post a Comment