पुणे मेट्रो प्रकल्पाच्या वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम दरम्यानच्या मार्गिकेचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रोचा हा मार्ग ७.१ किलोमीटरचा असून, या मार्गावर आठ स्टेशनचे बांधकाम केले जाणार आहे. पौड रस्ता, कर्वे रस्ता, नदीपात्र, काँग्रेस भवन रस्ता, महापालिका या मार्गे धान्य गोदामापर्यंत शहरातील सर्वांत जास्त वाहतुकीच्या मार्गावर काम सुरू असले, तरी गेल्या वर्षभरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) वेगाने काम पूर्ण केले आहे.
No comments:
Post a Comment