पुणे : चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रीकरणासाठी मैदान दिल्याच्या मुद्द्यावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शनिवारी एक तासाहून अधिक काळ चर्चा रंगली. या मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव सदस्यांनी मांडला. त्यानंतर विद्यापीठाने त्याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच यावरून अधिसभेच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल अधिसभेचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर तहकुबीचा प्रस्ताव मागे घेण्यात आला.
No comments:
Post a Comment