पुणे- ऐन दिवाळीच्या तोंडावर तुपामध्ये भेसळ करण्यात येणाऱ्या गोडाऊनवर छापा घालून भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल 412 किलो भेसळयुक्त तूपसाठा जप्त केला. बिबवेवाडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या दुकानात हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, केशरसिंग मानसिंग राठोड (वय 40, रा. अप्पर इंदिरानगर) असे त्याचे नाव आहे.
No comments:
Post a Comment