मुठा उजवा कालवा फुटीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी कालव्याच्या 15 धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भराव खचले आहेत, तर काही ठिकाणी कालव्याला भगदाड पडून गळती सुरू असलेल्याचे ‘पुढारी’च्या पाहणीत आढळून आले. कालव्यातून पाणी सोडल्यानंतर गळती वाढून भविष्यात कालवा फुटीची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.
No comments:
Post a Comment