श्रीमंत दगडूशेठ गणपतीची भक्ती ही पुण्यातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. पुण्याच मानाचे स्थान असलेल्या या गणपतीला भाविक अतिशय भक्तीभावाने पूजतात. गणेशोत्सवाच्या काळात भक्त या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत थांबतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला नवसही बोलला जातो. मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त बाप्पाची पुन्हा भक्तीभावाने पूजाअर्चा करतात. अशाच बाप्पाच्या एका भक्ताने आपल्या या लाडक्या दैवतासाठी एक अनोखी भेट दिली आहे. बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाचा प्रसाद या भक्ताने दिला आहे. पण हा मोदक एक-दोन नाही तर तब्बल १२६ किलोंचा आहे. आता १२६ किलोच का असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल, तर यंदा मंडळाने १२६ वर्ष पूर्ण केली असल्याने १२६ किलोंचा मोदक करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment