Monday, September 17, 2018

ऊर्जात्मक सादरीकरणाने ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन

सनईचे सूर... गणेश वंदनेने भक्तीमय झालेले वातावरण... मल्लखांबाची प्रात्याक्षिके.. तीन साहित्यिकांना केलेले वंदन.. स्त्री शक्तीचा अनोखा पोवाडा आणि फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया यासारख्या एक ना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उर्जात्मक सादरीकरणाने तिसाव्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन पार पडले. ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना, खासदार हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment