Tuesday, September 18, 2018

मीटर तपासणीसाठी जर्मनी दौऱ्याचा घाट

पुणे – शहरातील नागरिकांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेत एएमआर पद्धतीचे मीटर बसविले जाणार आहेत. या योजनेचे काम मिळालेल्या “एल अॅण्ड टी’ या ठेकेदाराने हे मीटर तयार करण्याचे काम जर्मनी येथील “सेनसेस’ यांना दिले आहे. या मीटरची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिकेचे दोन अधिकारी जर्मनी येथे जाणार असून, त्यांचा सर्व खर्च “एल अॅण्ड टी’ करणार आहे. या अधिकाऱ्यांना जर्मनी येथे जाण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव पालिकेने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मंजुरी देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

No comments:

Post a Comment