Tuesday, September 18, 2018

महाराष्ट्र बॅंकेची कॅश रिसायकलर्स सेवा सुरू

पुणे: बॅंक ऑफ महाराष्ट्रचा 84 वा वर्धापनदिनानिमित्ताने 75 कॅश रिसायकलर्स सुरू करून एटीएम सुविधेस नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. आगामी काळात बॅंक प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नफा मिळवण्याकडे वाटचाल करेल, असा विश्‍वास बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. व्ही. पटवर्धन यांनी व्यक्त केला.
बॅंकेच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमास डॉ. पटवर्धन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कॅश रिसायकलर्स ही सुविधा एटीएएम्स सोबत प्राप्त होणार आहे. एटीएमच्या सध्याच्या पैसे काढणे, पिन नंबर बदलणे, रक्कम ट्रान्स्फर करणे या सुविधांबरोबर एटीएम्‌ कार्डासह किंवा कार्डाविना रु. 2000, 500, 200, 100 आणि 50 रुपयांच्या कमाल 200 नोंटांचा गठ्ठा (बंडल) जमा करता येणार आहे.

No comments:

Post a Comment