पुणे – शहरातील मध्यवर्ती भागातील डांबरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी गणेशोत्सवानंतर हाती घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. पावसाळ्यानंतर अनेक रस्ते उखडले असून बहुतांश रस्त्यावर खोदाई नंतर करण्यात आलेले दुरुस्तीचे काम तकलादू झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे बहुसंख्य रस्त्याचे पुर्नडांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून खराब रस्त्यामुळे बहाल झालेल्या मध्यवस्तीमधील पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
No comments:
Post a Comment