Monday, September 17, 2018

मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्‍वरी

लोकमान्य टिळकांनी चालू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा 126 वे वर्ष साजरे करीत आहे. पुण्यनगरीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांनी ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्‍वरीच्या गणपतीस मानाचा क्रमांक दोन दिला हे सर्वश्रुत आहे. पुण्यातील कसबा गणपती हे ग्रामदैवत व श्री तांबडी जोगेश्‍वरी ही ग्रामदेवता म्हणून प्रसिध्द आहेत. 1893 पासुन तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव पारंपारिक पध्दतीने तसेच शिस्तबध्द स्वरुपात साजरा केला जातो. श्रीं ची उत्सवमुर्ती दरवर्षी शाडू मातीची नवीन बनवून प्राणप्रतिष्ठा करुन अनंत चतुर्दशिला मुठा नदीच्या पात्रात विसर्जित करण्यात येते. ही मूर्ती सध्याचे मूर्तीकार श्री. द. म. गुळूंजकर याच्या घराण्यातच गेली 121 वर्षे बनवली जाते.

No comments:

Post a Comment