पुणे - योजना राबविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध करून दोन दिवसही झाले नसतानाच कामे रखडण्यामागे नगरसेवकांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. नियोजित कामांचे ठिकाण बदलण्यासोबत वर्गीकरणाच्या आग्रहामुळे बहुतांशी निविदा काढण्यात अडचणी येत असून, निविदांच्या अटी-शर्ती बदलण्याचा उद्योग होत असल्यानेच योजनांचा मुहूर्त हुकत असल्याचे दिसून आले आहे. कामे न होण्यास नगरसेवक जबाबदार असल्याचे प्रशासनानेही जाहीर केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील योजना फसण्यामागे प्रशासनापाठोपाठ नगरसेवकही जबाबदार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment