पुणे - वाहन चालविण्याचा परवाना (लायन्सस) देण्याची प्रक्रिया वेगवान केल्याचा दावा परिवहन खात्याने केला असला तरी, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ही यंत्रणा कोलमडली आहे. एका महिन्यात परवाना मिळणे अपेक्षित असतानाही लोकांना मात्र, तीन-तीन महिने प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) चकरा माराव्या लागत आहेत. नोंदणी केलेल्या काही जणांना तर तीन महिन्यांहून अधिक काळ परवानाच मिळत नाही. नव्या वाहनांच्या पासिंगसाठीही दुप्पट वेळ जात असल्याची तक्रार आहे.
No comments:
Post a Comment