पौड रस्ता : येथील जोग हॉस्पिटलजवळ व कर्वे रस्त्यावर सोनल हॉलसमोर चेंबर खचले व तुटले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मेट्रोच्या कामामुळे पौड रस्ता व कर्वे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच गणेशोत्सवामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात रस्ता दुरुस्तीची कामे, मेट्रो, तसेच पदपथ दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे केले जाणार होते. परंतु पदपथ व चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी अद्याप कोणीही पुढाकार घेतलेला नाही.
No comments:
Post a Comment