पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बाजार समिती आणि दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने मार्केट यार्डात “स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता बाजार आवारातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळा येथे अभिवादन करून या अभियानास सुरूवात होणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.


No comments:
Post a Comment