Wednesday, October 24, 2018

बीआरटीचा निधी पळवला

सोलापूर 'बीआरटी' नव्याने विकसित करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या ११ कोटी ५० लाख रुपये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी प‌‌ळवून या रकमेचे आपल्या प्रभागातील विकासकामांसाठी वर्गीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, हा 'बीआरटी' विकसित करण्यासाठी आवश्यक विकास कामांचे नियोजन करण्यात आले असून, या निविदा 'एस्टिमेट' कमिटीत ठेवण्यात येणार आहे. या विकासकामांसाठी ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, त्याचवेळी या कामाचा निधी भाजपच्या नगरसेवकांनी पळविल्याने महापालिका प्रशासनाने कपाळावर हात मारून घेतला आहे.

No comments:

Post a Comment