पुणे – महापालिकेने गेल्या चार वर्षांत शहरात बसविलेले विद्युत खांब (पोल) पालिकेच्या “एन्टरप्रायजेस जीआयएस’ प्रणालीवरून गायब झाल्याचे समोर आले होते. मात्र, यातील जवळपास 20 हजार पोल पहिल्या सुस्थितील असलेल्या खांबांजवळ नव्याने लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या ऑनलाइन यंत्रणेवर संबंधित ठिकाणी एकच पोल दिसत आहे. मात्र, पाहिले पोल असताना दुसरे पोल कशासाठी बसविले आणि त्यासाठी लाखो रुपयांच्या खर्चाला जबाबदार कोण, याचे उत्तर पालिकेकडे नाही.
No comments:
Post a Comment