पुणे – वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या जुन्या ई-मशीन्सला मर्यादा येत होत्या. मात्र, नुकत्याच वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात फोर-जी अत्याधुनिक 250 मशीन्स दाखल झाल्या असून मशिनव्दारे फोटो, व्हिडीओ चित्रीकरण होणार आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसेल, असा विश्वास वाहतूक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment