पुणे - महापालिकेत समावेश झालेल्या २३ गावांमधील रस्ते रुंदीकरण करण्याबाबत राज्य सरकारने आठ-नऊ वर्षांपूर्वी आदेश देऊनही महापालिकेच्या धोरणामुळे त्यावर कार्यवाही झाली नाही. तेव्हाच या गावांमधील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांमुळे काही रस्ते गायब झाल्याची स्थिती असल्याने त्यांचे रुंदीकरण कराचे कसे, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. या गावांत किती लांबीचे रस्ते आहेत, ते कुठे आहेत, याचा तपशीलही संबंधित खात्याकडे उपलब्ध नाही. मात्र, या गावांत साडेनऊशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची बांधणी करावी लागेल, असे ढोबळ उत्तर प्रशासन देत आहे.
No comments:
Post a Comment